
Contents
- 1 Ashti Dalit Atrocity Case: विकास बनसोडेची हत्या ,’सैराट आनर किलींग’ आहे का? – संपूर्ण माहिती!
- 1.1 Satyashodhak News 20 March 2025 :
- 1.2 खास भेट:
- 1.2.1 सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
- 1.2.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.2.3 हत्या अत्यंत क्रुरपणे—-
- 1.2.4 पोलिस तपास आणि प्राथमिक निष्कर्ष—
- 1.2.5 हत्येचे संभाव्य कारण आणि सामाजिक परिणाम—
- 1.2.6 पोलीस आणि प्रशासनाची भूमिका—
- 1.2.7 परिसरातील नागरिकांची प्रतिक्रिया: न्यायाची मागणी—-
- 1.2.8 निष्कर्ष—–
- 1.2.9 About The Author
Ashti Dalit Atrocity Case: विकास बनसोडेची हत्या ,’सैराट आनर किलींग’ आहे का? – संपूर्ण माहिती!
Satyashodhak News 20 March 2025 :
(Satyashodhaknews News)
Ashti Dalit Atrocity Case: विकास बनसोडेची हत्या ,’सैराट आनर किलींग‘ आहे का?की Normal कारण ? – संपूर्ण माहिती या बातमीत ‘सत्यशोधक न्युज‘ देण्याचा प्रयत्न करत आहे. या हत्तेत एकुण 10 आरोपी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे हे आरोपी एकमेकांचे नातलग आहेत.
दलित तरुणाची धक्कादायक हत्या—-
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कडा येथे एका दलित तरुणाची धक्कादायक हत्या होण्याचे प्रकरण समोर आले आहे. विकास बनसोडे या 23 वर्षीय दलित तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे कारण काय? पोलिस तपास कुठपर्यंत पोहोचला आहे? आरोपी कोण आहेत? या सर्व मुद्द्यांचा आढावा या लेखातून घेऊया.
Read more >>
दलित तरुण विकास बनसोडे हत्या प्रकरण : नेमके काय घडले?

अष्टी तालुक्यातील कडा या गावात विकास बनसोडे हा 3 वर्षांपासुन ड्रायव्हर म्हणुन काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याचे मालक भाऊसाहेब क्षिरसागर यांच्या मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले.त्यामुळे भाऊसाहेब क्षिरसागर यांच्याशी त्याचा वाद झाला. त्याला भाऊसाहेब क्षिरसागर यांनी कामावरुन काढुन टाकले होते. तीन दिवसांपुर्वी विकास बनसोडे मित्रासह त्या मुलीला भेटायला आला. मात्र विकास बनसोडे व ती मुलगी हे भाऊसाहेब क्षिरसागर यांना आक्षेपार्ह अवस्थेत शेतात दिसले. तेव्हा त्यांचा परत वाद झाला.तो इतका टोकाला गेला की त्याचा निर्घृण खून करण्यात आला.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
हत्या अत्यंत क्रुरपणे—-
मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या अत्यंत क्रुरपणे करण्यात आली.दोन दिवस विकास बनसोडे याला पत्र्याच्या शेडमधे बांधुन ठेवण्यात आले.दोन दिवस त्याला अमाणुश मारहाण करण्यात आली. मारहाणीसाठी रस्सी व वायरचा वापर करण्यात आला.भाऊसाहेब क्षिरसागर यांनी व इतर 9 जणांनी मिळुन त्याला ठार मारले. त्यांच्याबरोबर आणखीन दोघे व एकुण 10 जण होते. या घटनेनंतर संपूर्ण अष्टी तालुका हादरला.नंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद पडले.
Read more >>
Atrocity Act नुसार अल्पवयीन मुलीशी दोन वेळा शारीरीक संबंध व धमकी दिल्याने गुन्हा दाखल!
पोलिस तपास आणि प्राथमिक निष्कर्ष—
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात असे समजले की, हत्येमागे कारण तरुणाचे मालकाच्या मुलोसोबत प्रेम संबंध हे आहे. तो (खालच्या ?) जातीतला असणे हे आहे का? की आणखीन काही कारणे असू शकतात .
पोलिसांनी भाऊसाहेब क्षिरसागर व अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी विकास बनसोडे यांच्या कुटुंबीयांनी , सामाजिक संघटनांनी केली आहे.
हत्येचे संभाव्य कारण आणि सामाजिक परिणाम—

अष्टीसारख्या ग्रामीण भागात जात हा भाग अजुन संपलेला नाही.जात तोंडात येत नसली तरी मनात असते.हे वास्तव आजही आहे. अशा स्थितीत अशा घटनांनी समाजात ,राज्यात मोठी सामाजिक खळबळ उडते. या हत्येच्या मागे नेमके कारण दलित तरुणाचे स्वतःच्या सवर्ण मुलीशी प्रेम संबंध असणे व तो दलित जातीतील असणे हेच होते.
या घटनेनंतर अष्टीत तणावाचे वातावरण आहे.दलित पक्ष,संघटना, कार्यकर्ते यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read more >>
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असाआरोपीचा दावा ?
पोलीस आणि प्रशासनाची भूमिका—
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगात करणे आवश्यक आहे.सत्य दडपण्याचा दबाव आला तरी तपास प्रामाणिक व सखोल केला पाहिजे. आरोपींना स्थानिक न्यायालयात पोलिस कस्टडीसाठी उभे केले जाणार आहे. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
परिसरातील नागरिकांची प्रतिक्रिया: न्यायाची मागणी—-
विकास बनसोडे यांच्या हत्येने आष्टी परिसरातील लोकांमध्ये संताप व दुख: व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी निषेध व्यक्त करत, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
निष्कर्ष—–
विकास बनसोडे हत्या प्रकरण हा केवळ एक गुन्हा नाही. तो समाजातील जाती द्वेशाची भावना अजुन असण्याचे निर्देशित करतो.भाऊसाहेब क्षिरसागर यांनी आपल्या मुलीचा यात दोष दिसला नाही.त्यामुळे ,’सैराट‘ चित्रपटातील कथेही हे कृत्य समानता दाखवते.ओनर किलींग सारखा हा गंभीर विषय आहे. या प्रकरणाचा तपास सखोल होऊन आरोपींना शिक्षा मिळावी, अशीच सर्वांची इच्छा आहे.
पुढील तपासानंतर या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येईल. तोपर्यंत पोलिस तपासाच्या अधिकृत घोषणांची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.