
Contents
- 1 अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ‘आप’ आक्रमक !
- 1.1 Arwind Kejariwal Supporters Aggressive
- 1.2 कथीत मद्य घोटाळ्यात अटक—
- 1.3 ईडीने कारवाई केली होती. ..
- 1.4 इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा सहभाग….
- 1.5 अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीचे शिल्पकार. …
- 1.6 लोकशाहीत विचारस्वातंत्र्य. …..
- 1.7 अरविंद केजरीवाल यांचे यश?
- 1.8 केंद्र सरकार प्रबळ !
- 1.9 सरकारी यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप…
- 1.10 हुकुमशाही प्रवृतीतुन?
- 1.11 About The Author
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ‘आप’ आक्रमक !
Arwind Kejariwal Supporters Aggressive
दिनांक 22 मार्च 2024 |प्रतिनिधी |

“Arwind Kejariwal Supporters Aggressive: देश संविधानाने, लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. बळजबरी फार काळ चालणार नाही.या देशातील लोक त्याळी सुद्धा म्हणजे आणीबाणीच्यानंतर सुज्ञ असल्याचे आपण पाहिले आहे. तसे परत घडू नये.देश प्रगतीत पुढे चालला आहे. तो मागे वळू शकतो जर इथली लोकशाही धोक्यात आली तर !”
अरविंद केजरीवाल ,मुख्यमंत्री,दिल्ली यांना ईडीने अटक केली. अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. आम आदमी पार्टीने नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केला. आप चे कार्यकर्ते महावीर कॉलेज जवळ आले असता त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी आप कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची तारांबळ उडाली होती.
कथीत मद्य घोटाळ्यात अटक—
कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली आप नेते मनीष सिसोदिया व खा. संजय सिंह यांना याआधी अटक झाली होती. गेल्या दीड वर्षामध्ये अनेक छापे टाकून देखील कोणतीही ‘मनी ट्रेल’ न सापडल्याने ईडी कोर्टाने ईडीला झापले होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसिंहिता लागू असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणे म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याचे आप प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
ईडीने कारवाई केली होती. ..
ईडीने कारवाई केलेल्या चौदा कंपन्यानी इलेकटोरल बॉण्ड्स (निवडणूक रोख्यांच्या) माध्यमातून भाजपला शेकडो कोटींच्या देणगी दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई थाबवण्यात आल्याचा आरोप अतुल दिघे यांनी केला.
इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा सहभाग….
यावेळी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मोर्चात सहभाग नोंदवला.काँग्रेसचे ऋषिकेश पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आप जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, किरण साळोखे, कुमाजी पाटील, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मोईन मोकाशी, रवींद्र राऊत, समीर लतीफ, आदम शेख, फिरोज शेख, आनंदा चौगुले, स्मिता चौगुले, मयुर भोसले, दिग्विजय चिले, नाझिल शेख, संजय नलवडे, राकेश गायकवाड अमरसिंह दळवी, प्रथमेश सूर्यवंशी, रणजित पाटील, अर्जुन कांबळे, निलेश रेडेकर, सुधाकर शिंदे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीचे शिल्पकार. …
अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत. सध्याचा माहौल पाहता भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त ठरलेले आहे हे सर्वांना माहित आहे. हे ही सर्वांना माहित आहे की हे सरकार प्रबळ अशा लोकसभा,राज्यसभा,अनेक घटक राज्यांत आकडेवारीने प्रबळ आहे.लागोपाठ 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सलग लोकसभा निवडणूक जिंकत आहे.आता 2024 ची लोकसभा निवडणूक समोर आहे.भारतीय जनता पक्ष तिसर्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्याची अपेक्षा बाळगुण आहे.कोणत्याही राजकीय पक्षाने अशी अपेक्षा बाळगणे काही गैर नाही.
लोकशाहीत विचारस्वातंत्र्य. …..
अरविंद केजरीवाल यांचे पुर्वसुरी संघाचे होते असे म्हणतात. म्हणजे पुर्वी ते संघाशी म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणणे काही राक्षस नाही.जर असता तर कॉन्ग्रेस वगैरे संघात्या विरोधी विचारांची सरकारे केंद्रात,राज्यात आली.संघी लोकांवर काही गुन्हे किंवा देशद्रोही वगैरे प्रकार सिद्ध होउन ती संघटना बंद केली गेली असती.तिची विचारधारा वगैरे आहे.लोकशाहीत विचारस्वातंत्र्य असते.तसे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो का कम्युनिस्ट असोत ! त्यांना आहे.पटला तर विचार घ्यावा.नाही तर सोडून द्यावा.विचार लोकशाहीत मुद्दे,पुरावे देवून खोडता येतो.तो.खोडावा.लोकांसमोर ठेवावा.लोक स्वतः ठरवतील.कोनता विचार योग्य आणि कोनता विचार अयोग्य.
अरविंद केजरीवाल यांचे यश?
अरविंद केजरीवाल यांनाही असे स्वातंत्र्य निश्चित आहे.त्याप्रमाणे त्यांनी पक्ष निर्माण केला.आम आदमी पक्ष. त्याला बर्रापैकी लोकांनी स्विकारले.आधी दिल्ली राज्यात,मग पंजाबमधे आम आदमी पक्षाचे सरकार बहुमताने आले.दोन तीन वेळा आले.उलटसुलट आरोफ प्रत्यारोप झाले.निवडणुकीत मैदान ए जंग झाले.भारतीय जनता पक्षाने देशभर यश मिळवले. आम आदमी पक्षाने दिल्ली,पंजाब आणि गुजरातमधेही चांगले यश मिळवले.
केंद्र सरकार प्रबळ !
आधी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष तिसर्यांदा केंद्रात सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो आहे.त्याच प्रमाणे अरविंद केजरीवाल हे आणि इतर बरेच पक्ष मिळुन सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यात काही गैर नाही. अशा स्थितीत बरेच अधिकार व संस्था केंद्र सरकारच्या हातात आहेत.संविधानाने केंद्रीय सरकार राज्य सरकारपेक्षा जास्त भक्कम ठेवलेले आहे. तेही योग्य आहे.कारण राज्य सरकारला जास्त अधिकार दिले तर फुटिरतावाद निर्माण होवू शकते.म्हणून लष्कर,परराष्ट्र धोरण,संरक्षण इ.विषय अशा प्रबळ केंद्रीय सरकारकडे असावेत.हे योग्यच आहे.सी बी आय,आय बी,ए टी एस,इडी इ.महत्वाच्या संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवण्यात आल्या आहेत.कोनतेही राज्य केंद्रीय सरकारपेक्षा प्रबळ नसते.हे योग्यच आहे.
सरकारी यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप…
आता आला प्रश्न महत्वाची खाती,संस्था इ.चा वापर देशाच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी करायचा की राजकिय विरोधकांना संपवण्यासाठी करायचा ? इथे आजच्या देशभर चाललेल्या राजकारणील घडामोडींच्या बाबतीतील प्रश्नांची उत्तरे काय आहेत ? ती दडली आहेत.अधिकार कायदेशीरपणे वापरले तर ठिकच आहे.त्यात काही गैर नाही.ते तसे वापरलेही गेले आहेत.कायद्यानुसारच आणीबाणी जाहीर करता येते.परत ती उठवता येते.काही तरतुदी विशिष्ट परिस्थितीत लागु करण्यासाठी असतात.पण अशी परिस्थिती कृत्रिमरित्या तयार करुन तिचा वापर सत्तेसाठी केला गेला तर?तसेही घडल्याचे आरोप ठेवण्यात आले होते.आहेत.
हुकुमशाही प्रवृतीतुन?
अरविंद केजरीवाल याच्या अटकेबाबत हाच प्रमुख मुद्दा आहे. त्यांची इडीने चौकशी करणे यात काही बेकायदेशीर नाही.त्यांना सामोरे जाणे भाग आहे. सत्य अखेरीस स्पष्ट होतच असते.अरविंद केजरीवाल अशा चौकशीला सामोरे जातही आहेत.परंतु काही फ्राड वगैरे हे आहेत की नाहीत,हे स्पष्ट जनतेसमोर स्पष्ट केले पाहिजेत.योग्य वेळेत केले पाहीजेत.ते निवडकीच्या तारखांच्या ‘सोईने’ थांवणे,वेळ काढून नेणे किंवा वेळ लांबवणे असे राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपुर्वक प्रबळ ठरु शकतील अशा विरोधकांना या पद्धतीने निवडणुकी प्रचारातुन बाहेर काठणे किंवा ठेवणे,त्यांचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने असे करणे,हे मात्र लोकशाहीला घातक आहे.हुकुमशाही प्रवृतींना पोषक अशी कार्यपध्दती आहे.त्यातुन राष्ट्र,त्याची एकात्यता,निकोप नांदणारी लोकशाही दीर्घकालीन भविष्याबाबत धोकादायक ठरते.संस्था वापरा.पण पक्षपातपूर्णपणे वापरू नका. असामाजिक तत्वांची सर्व प्रकारे छाननी करा.कोणीच त्यातुन सुटु नये.
शेवटी एक आहे की देश संविधानाने, लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. बळजबरी फार काळ चालणार नाही.या देशातील लोक त्याळी सुद्धा म्हणजे आणीबाणीच्यानंतर सुज्ञ असल्याचे आपण पाहिले आहे. तसे परत घडू नये.देश प्रगतीत पुढे चालला आहे. तो मागे वळू शकतो जर इथली लोकशाही धोक्यात आली तर !
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••
1. Election Commission of India – Model Code of Conduct
👉 https://eci.gov.in/mcc/
(आचारसंहिता म्हणजे काय, निवडणूक काळातील बंधने)
2. Enforcement Directorate (ED) – About and Powers
👉 https://dor.gov.in/about-us/directorate-enforcement
(ईडी म्हणजे काय, त्याचे अधिकार काय आहेत)
3. PRS Legislative Research – Arrests and Investigation Process in India
👉 https://prsindia.org/policy/vital-stats/police-and-custodial-arrests
(भारतामधील अटक आणि चौकशीची प्रक्रिया)
4. ADR India – Electoral Bonds and Political Donations
👉 https://adrindia.org/content/electoral-bonds
(इलेक्ट्रोरल बॉण्डसचा राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीवरील प्रभाव)
5. National Portal of India – Right to Protest
👉 https://www.india.gov.in/spotlight/fundamental-rights
(लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार कायदेशीर आणि घटनात्मक संदर्भ)
6. Live Law – Analysis on Kejriwal Arrest (Free legal commentary platform)
👉 https://www.livelaw.in/
(कानूनी विश्लेषण आणि अद्ययावत घडामोडी)
7. Scroll.in Politics – Kejriwal & ED Coverage
👉 https://scroll.in/topic/723/arvind-kejriwal
(अरविंद केजरीवाल व ईडी संदर्भातील वर्तमान घटनाक्रम)
8. The Wire – Democracy, Dissent and Institutions
👉 https://thewire.in/
(राजकीय विश्लेषण व सरकारी संस्थांच्या भूमिका यावर परखड लेख)
9. Alt News – Fact Check on Political Claims
👉 https://www.altnews.in/
(राजकीय नेत्यांचे दावे, तथ्य पडताळणी)
10. BBC Marathi – राजकीय घडामोडींचे विश्लेषण
👉 https://www.bbc.com/marathi
(अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारणाची सखोल माहिती)