
Dr.Nitin Pawar,Editor,satyashodhaknews.com
Contents
- 1 ‘आमदारां’ चे ( क्वचित अपवाद) काय खरे धंदे आहेत व काम काय आहे याची ही माहिती ! वाचा आणि विचार करा….–‘आप ‘ चे डॉ.नितीन पवार यांचे आवाहन !
- 1.1 ‘आमदारां’ ची राज्यव्यापी, ‘ईडी’चौकशी करावी !— ‘आप ‘, नेते डॉ.नितीन पवार
- 1.1.1 शिरुर,दिनांक-9 आक्टोंबर:
- 1.1.2 ईडी चौकशी करावी. ….
- 1.1.3 बेकायदेशीर धंद्यांना आसरा….
- 1.1.4 शेतकरी कष्टच कष्ट करून मरतो….
- 1.1.5 कंत्राटदार माजवले….
- 1.1.6 यांना हप्ते चालु?……
- 1.1.7 जमिनी लाटल्या…..
- 1.1.8 गुंड,भाई,मवाली,दादा,भाऊ,तात्या यांनीच जन्माला घातले…
- 1.1.9 घराणेशाही यांनीच सुरु केली आहे….
- 1.1.10 पत्रकारांना लाचार यांनीच बनवले…..
- 1.1.11 परिवर्तनाच्या चळवळी संपवल्या……
- 1.1.12 About The Author
- 1.1 ‘आमदारां’ ची राज्यव्यापी, ‘ईडी’चौकशी करावी !— ‘आप ‘, नेते डॉ.नितीन पवार
‘आमदारां’ चे ( क्वचित अपवाद) काय खरे धंदे आहेत व काम काय आहे याची ही माहिती ! वाचा आणि विचार करा….–‘आप ‘ चे डॉ.नितीन पवार यांचे आवाहन !
‘आमदारां’ ची राज्यव्यापी, ‘ईडी’चौकशी करावी !— ‘आप ‘, नेते डॉ.नितीन पवार
शिरुर,दिनांक-9 आक्टोंबर:
‘आमदारां’ चे ( क्वचित अपवाद आहेत ) काय खरे धंदे आहेत व काम काय आहे याची ही माहिती वाचा आणि विचार करा.असे आवाहन ‘आप ‘चेशिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील उमेदवार डॉ.नितीन पवार यांनी आवाहन केले आहे.कोणा एका
‘आमदारां’ चीच नाही राज्यव्यापी, सर्व आमदारांची ‘ईडी’ चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर सरपंच आणि नगरसेवक, न आराध्यक्षांच्या संपत्तीचीही ईडी चौकशी व तपास केला पाहीजे. व यांच्याकडील अतिरिक्त काळे पैसे सरकार जमा करुन विकास कामांना वापरला पाहिजे. यात अनेक अन्य ‘चोरा’चा समावेश व्हायला पाहिजे. पण राज्यातल्या फक्त आमदारांबद्दलच इथे लिहित आहे.
ईडी चौकशी करावी. ….
ACB,CBI,IB, CID, IT व ED इ.सरकारी संस्थांना मेल द्वारे सामान्य नागरिकांनी,आम आदमीने याचा पाठपुरावा करुन पहावा ! या महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराची व त्याच्या संपत्तीची ईडी चौकशी सखोलपणे करण्यात यावी.
कशाला यांना पेन्शन पाहिजे. कशाला यांना संरक्षण पाहिजे. ही आमदार मंडळी जनतेचे सेवक आहेत ना मग कशाला पोलीस बंदोबस्त पाहिजे?
बेकायदेशीर धंद्यांना आसरा….
सगळे आमदार डोंगी आहेत. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. सर्व बेकायदेशीर व्यवसाय, जुगार मटके, भेसळ दारू भट्टीचे अड्डे, मावा, गांजा, चरस,वेश्या व्यवसाय, त्यातील दलाल, सर्वच आमली पदार्थ खुलेआम विक्री करणे चालू आहे. कोयता टोळी मोकार फिरत आहेत. लहान मुलींची दररोज अब्रू लुटत आहेत. जिवंत मारत आहेत. बलात्कार होत आहेत. गरिबांना धमकी देऊन जमीन लुटत आहेत. तहसिलदार कार्यालय परिसरात बेकायदेशीर स्टँप वेंडर,अतिक्रमणे, खालुन वर फोन गेला तर त्याचे काम होणार नाही.ज्या खेडुताला हे काही माहिती नसते.त्या या कार्यालयांकडुन पळ पळ पळायला लावणार्यांना ‘निर्लज्ज’ व ‘भ्रष्ट’ सरकारी नोकरांदारांना आशिर्वाद या आमदारांचाच असतो.
शेतकरी कष्टच कष्ट करून मरतो….
अरे शेतकरी कष्ट करून पूर्ण पणे मेला तरी या आमदार मंडळींना स्वतःच्या व्यवसाय धंदा आणि पुढच्या शंभर पिढीची किंवा मंत्रीपदाची काळजी पडलेली असते का?
कंत्राटदार माजवले….
अनेक आमदार यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत, दूध संस्था आहेत, कारखानदारी आहेत, लहान मोठ्या अनेक कंपन्या आहेत, मोठं मोठी कंत्राटी कामगार लॉबी यांचीच आहेत. महाराष्ट्रात बिल्डर व्यवसाय यांचाच आहे. सर्वसामान्य माणूस तिथे मर मर कष्ट करून मरत आहेत.प्रचंड आर्थिक व श्रमाचे शोषण यांच्यामुळेच अव्याहतपणे चालु आहे.कंत्राटदार यांचीच माणसे असतात.हे माजलेले आहेत.जास्तीत जास्त काम करुन घ्यायचे व कमित कमी मोबदला द्यायचा आणि अमाप पैसा लुटणारे लोक त्या त्या भागातील आमदारच असतात.
यांना हप्ते चालु?……
अनेक आमदार मंडळींना महिन्याला हफ्ते चालू आहेत.सर्व दोन नंबर धंदेवाल्यांकडुन ! ही बांडगुळे कधी रानात जाताना पाहिले का? कधी जनावरांना चारा किंवा धारा काढताना, शेण काढताना यांना पाहिले का? कधी दूध घालताना किंवा नोकरी करताना पाहिले का? यातील कित्येक बाप कमाईवरचे तट्टू आहेत.काही कर्तृत्व नाही.गरीबीचा अनुभव नाही.त्यामुळे सामान्य माणुस भरडला जातो.
जमिनी लाटल्या…..
जनता कधी जागी होणार? प्रत्येक तालुक्यातील जमिनी कोणाच्या नावावर आहेत. कोनाचे ७/१२ रे उतारे निघत आहेत बघा. जर वेळेत आपण नागरीक जागो नाही झालो तर आपली पुढची पिढीची अवस्था श्रीलंका, पाकिस्तान व बंगला देशात जशी आहे तशी होईल.युद्ध घडवुन लोकसंख्या (आपण) कमी केली जाईल. मग अनेक राजकीय मंडळी आपला भारत सोडून पळुन जातील. सरळ सरळ जाती जाती मद्ये भांडण लावत आहेत.धर्मांमधे भांडणे लावत आहेत. अनेक राजकीय मंडळी ठेकेदार व भांडवलदार यांना गावापासून ते देशा पर्यंत हाताला धरून पैसाच कमवत आहेत. यांना समाजाचे काहीच घेणे देणे पडले नाही.
गुंड,भाई,मवाली,दादा,भाऊ,तात्या यांनीच जन्माला घातले…
अहो साधी शिपाई भर्ती करायचे म्हटलं तरी १० वी, १२ वी शिक्षणाशिवाय नोकरी मिळत नाही आणि आपण यांना निवडुन देवुन आपण आपलं व आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य अनपड, गंवार, गुंड, हुकूमशाही प्रवृतीच्या लोकांच्या हातात देणार का? आणि मग हे गुंड, मवाली, भडवे पदव्युत्तर सुशिक्षित MPSC, UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IPS, IRS अधिकारी यांना आदेश देऊन जनतेचे प्रश्न सोडवणार का? आणि आपला देश घडवणार का?
घराणेशाही यांनीच सुरु केली आहे….
स्वताचीच सुमार गुणवत्ता असलेली मुले,मुली यांना पुढे आणुन घराणेशाही आपल्या माथी मारणारे हेच आमदार आहेत.टाळ्या स्वता वाजवायला सुरु करुन मग आपल्याला वाजवायला लावणारे खास चमचे राज्यभर या आमदारांनीच तयार केले.
पत्रकारांना लाचार यांनीच बनवले…..
पत्रकारांना पगार नसतो.नाव मोठे पण उत्पन्न छोटे. अशा स्थितीत असणार्या पत्रकारांना खरे लिहीण्यापासुन परावृत्त यांनीच केले. काहींना हप्ते,जाहिराती,बार,हाटेल ‘फ्री’ केले.पितपत्रकारांची पिलावळ राज्यभर निर्माण केली.पत्रकारिताच संपवली !
परिवर्तनाच्या चळवळी संपवल्या……
परिवर्तनाच्या समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी,मार्क्सवादी चळवळी यांनीच संपवल्या.राजकीय स्वार्थासाठी हे अंधश्रध्दा, समाजिक विषमता,भेदभाव यांवर कधी काहीच बोलत नाहीत.या चळवळीतील गरीब कार्यकर्त्यांना जयंत्या,उत्सव यांच्यासाठी चिरीमिरी देवुन कार्यक्रम करवुन राजकीय प्रचारासाठी वापरले.या सर्व चळवळी महापुरूषांनी सुरु केल्या होत्या.त्या आज कुठेच दिसत नाहीत. खर्या व स्वाभिमानी कार्यकर्यांना एकटे पाडले.त्यांची बदनामी केली.गरीबीचा गैरफायदा घेतला.त्यांची कोनतीच आर्थिक कामे होवू न देण्याची खबरदारी घेतली.त्यांची आर्थिक नाकेबंदी केली.त्यांना निष्प्रभावी केले.हे सर्व तमाम आमदारांनी केले.
जो व्यक्ती जनतेला दररोज किमान १२ तास वेळ व ज्याची सपत्तीं 25 लाख पेक्षा जास्त नाही, ज्याचे शिक्षण किमान पदवीधर आहे, ज्याच्या नावावर एकही खुनाचा व इतर कोनताही गंभीर आरोप नाही,ज्याने भ्रष्टाचार केलेला नाही त्याच उमेदवारांना आपण विधानसभा निवडणुकीत मतदान केले पाहिजे.