
Contents
- 1 आंबेडकरवाद म्हणजे काय?
- 1.1 आंबेडकरवाद कालबाह्य झाला आहे की नव्याने गरजेचा बनला आहे?
- 1.2 खास भेट:
- 1.3 आंबेडकरवाद म्हणजे काय?—–
- 1.4 तो ‘सापेक्ष’ म्हणजे देखील असतो—-
- 1.5 आंबेडकरवादाची वादाची व्याप्ती कुठपर्यंत आहे?
- 1.6 — क्रांतीकारी जय भिम !🙏
आंबेडकरवाद म्हणजे काय?
आंबेडकरवाद कालबाह्य झाला आहे की नव्याने गरजेचा बनला आहे?
सत्यशोधक न्युज लेख ;
( डॉ. नितीन पवार, संपादक,पुणे)
आंबेडकरवाद म्हणजे काय? आंबेडकरवाद कालबाह्य झाला आहे की नव्याने गरजेचा बनला आहे?या व अशा प्रश्नांची उत्तरे हा व्यापक चिंतनाचा, विश्लेषणाचा आणि भारतीय समाज्याच्या कसोटीच्या व सचोटीच्या परिक्षेचा विषय आहे. सत्यशोधक न्युज एक नवीन श्रेणी/Catagory, ‘ आंबेडकरवाद’ ही सुरु करत आहोत.आजच्या बददलेल्या एकुण सर्व क्षेत्रातील परिस्थितित निर्माण झालेले प्रश्न व त्यांची उत्तरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात व तत्वज्ञानात आहेत का? असतील तर ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. कारण आम्ही बाबासाहेबांचे लेखन , चिंतन ऐकत वाचत वाढलो.जगण्याच्या संघर्षातून त्यांची आवश्यकता आज सर्वात जास्त आहे. हे आमच्या अल्पबुद्धीला निश्चित जाणवले आहे.म्हणुन आम्ही यावर या ‘आंबेडकरवाद‘ या श्रेणीत लिहून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे एक मिशनच सुरु केले आहे.त्याची ही सुरुवात!
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक ‘सत्यशोधक मार्क्सवादी’, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
आंबेडकरवाद म्हणजे काय?—–
आंबेडकरवाद म्हणजे काय? असे आपण म्हणतो तेव्हा त्यात ,’ वाद’ असा शब्द आंबेडकर या नावाला जोडुन येतो.याचा काही एक अर्थ आहे. ‘वाद’ याला इंग्रजी मधे ,’ इझम ‘( ism) असे म्हणतात.ते का? हे आपण समजुन घेणे आवश्यक आहे. इझम म्हणजे एक परिपुर्ण असा विचार अशा अर्थाने असते. इझम एक तत्वज्ञान असते.
तत्वज्ञान म्हणजे काय ?—-
तत्वज्ञान म्हणजे ‘त’ ते ‘त्व’ म्हणजे जसे आहे तसे समजणे.असा आहे.ते म्हणजे काय? तर ‘सत्य‘ ! सत्य मांडणारा एक जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाणारा विचार असतो.अजुन कुणी सर्व आणि अंतिम सत्य जाणल्याचा दावा केलेला नाही. तसा तो आंबेडकरवाद देखील करत नाही. स्वतः आंबेडकर देखील मान्य करतात.की त्यांनी केवळ समुदातुन एखादी बादली भरुन घेणे इतपतच ज्ञान मिळवले आहे.

आणि तोच ,’ आंबेडकरवाद ‘ बनला—–
त्याला कारण आहे.ज्ञानाचे मुळ अगदी ब्रम्हांड निर्मिती ,स्थिती,लय,स्वरुप,भौतिकीचे ज्ञात अज्ञात नियम वगैरे असा फार मोठा तो पसारा आहे.अगदी दिवसातले 24 तास ज्ञान साधना केली तरी ते सर्व ज्ञान एका व्यक्तीचा जीवनकाळ पाहिला तर ते मिळवण्यासाठी अत्यंत कमी आहे. एकढेच नाही तर नगण्यच आहे.म्हणुन एवढे समजले तरी ‘ज्ञान‘ झाले.सार कळले.असे म्हटले जाते. पण प्राप्त परिस्थितीतील मानवी कुतुहलाला जितके कुतुहल निर्माण झालेले आहे.तेवढ्या प्रश्नांची उत्तरे देणारे एक विचारविश्व असेल तर ते तत्वज्ञान बनते.आंबेडकरांनी ते केले.त्यासाठी शक्य तितके पुरावे दिले.तर्क दिले.म्हणुन ते तत्वज्ञान म्हणण्याइतके भक्कम झाले.आणि तोच ,’ आंबेडकरवाद ‘ बनला.
तो ‘सापेक्ष’ म्हणजे देखील असतो—-
तो सकारात्मक असतो.म्हणुन तो मान्य केला जातो. पण एक लक्षात ठेवा की तो ‘सापेक्ष‘ म्हणजे वेगवेगळ्या बाबासाहेबांसारख्या प्रज्ञावंताकडुन निर्माण होतो.म्हणुन गांधीवाद आहे,मार्क्सवाद आहे,हिंदुत्ववाद आहे,गोळवलकरवाद आहे,हेगेलवाद आहे.नित्शे,अगदी अलिकडील काफ्का व ईव्हाल नोहाअ हरारी असे मोठे तत्वज्ञ निर्माण होत असतात.कदाचित उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्यावर नवीन इझम समोर येणे हे अपरिहार्यच आहे.आणि काळाच्या मर्यादा सुद्धा अशा इझम ला असतात.असे दिसते.जसे क्वांटम फिजीक्स,कृत्रीम बुद्धीमत्ता अशा काही नव्या संकल्पना पुर्वीच्या प्रज्ञावंत तत्वज्ञान्यांच्या तत्वज्ञानात येत नाहीत.आणखीन आज आपल्याला माहित नसणार्या अगदी कल्पनाही न केल्या गेलेल्या संकल्पना पुढे येतीलच येतील ! तर जो प्रज्ञावंत असा व्यापक विचार मांडतो.तो विचार त्याचे तत्वज्ञान बनते.तसा आंबेडकर यांचे विचार म्हणजे ‘आंबेडकरवाद’ अशी एक सहज समजेल अशी व्याख्या आपण सामान्य माणसाला समजण्यासाठी करु शकतो.

आंबेडकरवादाची वादाची व्याप्ती कुठपर्यंत आहे?
अर्थ असा निघतो की आंबेडकरवादाची व्याप्ती मोठी आहे.पण ती कुठेतरी थांबणारी सुद्धा आहे.हे आपण मान्य करु.म्हणुन ही व्याप्ती आपण शोधण्याचा प्रयत्न करु.त्यातुन आजच्या समाजाला माणसाला जगताना उपयोगी पडेल.असा भाग शोधण्याचा प्रयत्न आपण करु.याचा अर्थ आपण असा दावा किंवा समजुत करुन नको घेवुयात की आपण त्यापुढचे तत्वज्ञान सांगत आहोत.तशी मांडणी करु पाहत आहोत.तर तसे नाही.त्याला कारणही आहे.
कृत्रीम बुद्धीमत्ता—-
की आपले पुर्ण आयुष्य आंबेडकरवाद समजण्यासाठी कमी पडेल इतके ते व्यापक आहे.यात कोणाला शंका असेल असे वाटत नाही. तरी एक शक्यता वास्तवात येत आहे ती ही की कृत्रीम बुद्धीमत्ता अगदी कमी वेळात बाबासाहेबाचे विचार तत्वज्ञान लिखीत,श्राव्य किंवा दृश्य स्वरुपात सागु शकेल.ते आता दुर राहिलेले नाही. असे झाले तर फायदा आपलाच होईल. तो हा की बाबासाहेबांचे विचार सहज उपलब्ध होणे,समजणे यासाठी होईल. त्याचा समाजाला देशाला उपयोगही होईल.मानवतेला उपयोग होईल.कारण बाबासाहेबांना ज्ञानक्षेत्रात जागतिक पातळीवर मान्यता मिळुन त्यांचा जन्मदिवस जगभर ,’ज्ञानदिन‘ माणला जाणे हे घडले आहे.
लेख विस्तारभयास्तव इथे थांबवु .आणि भाग – 1 असे समजु.
पुढील माग-2 मधे आपण, ‘आंबेडकरवादाचे स्वरुप ‘ समजुन घेण्याचा प्रयत्न करु !
(क्रमश:)
—-
आमच्या वाचकांना आम्ही ही विनंती करतो की सत्यशोधक न्युज चे संपादक गेली तीस वर्षे आंबेडकरवादासह इतर अनेक ,’ वाद ‘ समजुन घेण्याच्या प्रक्रियेत आहेत.म्हणुनच जे समजले ते आजच्या काळात सामान्य माणसाला सोप्या भाषेत माहिती करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपण देखील काही चुक असेल तर आमच्या लक्षात आणुन द्यावी.ती दुरुस्त करुन घेवुन वाचकांपर्यंत पोचवु.म्हणुन हे वाचा,कमेंट बाक्समधे लिहा,आमच्याशी संपर्क करा. आपले विचार सुद्धा आमच्याकडे पाठवा.त्यांना सत्यशोधक न्युज मधुन प्रकाशित केले जाईल.लेख शेअर करा.आमच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 7776033958 व इ मेल np197512@gmail.com ला पाठवा.आपलेच हे विचारपिठ आहे.त्यांना प्रकाशित केले जाईल!