आंबेडकरवाद म्हणजे काय?

आंबेडकरवाद म्हणजे काय? आंबेडकरवाद कालबाह्य झाला आहे की नव्याने गरजेचा बनला आहे?या व अशा प्रश्नांची उत्तरे हा व्यापक चिंतनाचा, विश्लेषणाचा आणि भारतीय समाज्याच्या कसोटीच्या व सचोटीच्या परिक्षेचा विषय आहे. सत्यशोधक न्युज एक नवीन श्रेणी/Catagory, ‘ आंबेडकरवाद’ ही सुरु करत आहोत.आजच्या बददलेल्या एकुण सर्व क्षेत्रातील परिस्थितित निर्माण झालेले प्रश्न व त्यांची उत्तरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात व तत्वज्ञानात आहेत का? असतील तर ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. कारण आम्ही बाबासाहेबांचे लेखन , चिंतन ऐकत वाचत वाढलो.जगण्याच्या संघर्षातून त्यांची आवश्यकता आज सर्वात जास्त आहे. हे आमच्या अल्पबुद्धीला निश्चित जाणवले आहे.म्हणुन आम्ही यावर या पुणे या श्रेणीत लिहून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे एक मिशनच सुरु केले आहे.त्याची ही सुरुवात!