AI,आर्टिफिशल इंटेलिजेंस, (कृत्रीम बुद्धिमत्ता) म्हणजे काय आहे?
AI अर्थात आर्टिफिशल इंटेलीजेंस, कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे? AI नवीन मानवी प्रजाती,species घेवुन येत आहे का?अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न संपादक डॉ. नितीन पवार रत आहेत.अगदीच इन्टरेस्टिंग catagory च AI त्यांनी सत्यशोधक न्युज ,या पोर्टलवर आणली आहे.वाचकांनी याचा भरभरून स्वाद व आनंद घ्यावा.
AI,आर्टिफिशल इंटेलिजेंस, (कृत्रीम बुद्धिमत्ता) म्हणजे काय आहे?
AI Convert Us Into Another Species?
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
” AI : आपले मोठे भाग्य ! जगातील अनेक मुलभुत स्थित्यंतरं आपल्या हयातीत घडत आहेत. कोरोनामुळे सर्व जग थांबलं ! जणु काळच थांबला ! हे आपण अनुभवलं.आजपावेतो मानवाने आणि त्याच्या पुर्वजांनी हे कधीच अनुभवलं नव्हते. मुक्त व्यापार पहिल्यांदाच अनुभवला. इथुन थेट अमेरिकेतील माणसाबरोबर अगदी व्हिडीओ संभाषण केलं . ‘बिग बन्ग’चा यशस्वी प्रयोग पाहिला. इंटरनेट अनुभवलं. ‘सरोगसी मदरशीप’ पाहीली. ‘मानवी क्लोन’ पाहिला . थेट प्रयोगशाळेत मुल जन्माला आलेलं पाहिलं . मंगळावर यान आपण उतरवलं.आणि आता मानवाला ‘सुपरमैन’ बनवणारे ‘AI’ अनुभवणार आहोत. कदाचित मानवी वसाहत परग्रही आपण पाहू. हेही पाहू कदाचित की मानव स्वत:ला एका चिपमधे रुपांतरीत करुन प्रकाशाच्या वेग प्राप्त करुन ब्रह्मांडाची सफर करायला निघेल ! पण मृत्युपासुन मानवाची सुटका झालेली पाहील का? किमान आपल्यानंतर !”
AI म्हणजे काय? —
AI अर्थातच Artificial Intelligence. म्हणजे कृत्रीम बुद्धिमत्ता.माणसाकडे बुद्धी निसर्गतःच आहे.याज बुद्धीच्या साहाय्याने मानवाने आजवरची आपली जगण्याची पातळी , दर्जा उंचावला.मानवाला आपले अस्तीत्व टिकवण्यामधे जे जे अडथळे येत असतात.त्यावर उपाय मानवाच्या या नैसर्गीक बुद्धीमुळे दूर करण्याचा प्रयत्न मानव करत आला आहे. त्याची बुद्धीसुद्धा उत्क्रांत झाली .आदिमानव आजच्या मानवाइतका बुद्धिमान नसतो हे आपण प्राणीसंग्रहालयात पहात असतो. मानव सतत निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. त्याचबरोबर नवनवीन कल्पना करण्याची क्षमता मानवी बुद्धिममधे विकसित झाली आहे. जसे पक्षी आकाशात उडत होते, तेव्हा ‘राईट बंधुं’ना माणुसही आकाशात उडत असल्याची कल्पना केली. त्यामुळे माणुस विमानाच्या सहाय्याने आकाशात उंच विहार करु लागला. तरी तो मुळ पक्षांच्या आकाशात उडण्याची बरोबरी होवू शकला नाही. विमानात बसल्यावर त्याला एक प्रकारच्या घरातच बसल्यासारखा अनुभव होतो !
AI आणि अलन मस्क—-
अनंत अशी जिज्ञासा मानवाकडे आहे. सर्वांकडेच नसते. पण काही प्रतिभावान लोकांकडे असतेच. त्याचे प्रमाणही निश्चत असावे. शंभरात एक पूर्ण मुर्ख निपजणार तर एक विद्वान असणारच ! बाकीचे average असतात. Average जगणार. Average मरणार. तर काही जगातच ,काही तर युगात एकदाच जन्माला येणार.पण जग बदलणार. जसे येशु, मोहम्यद पैगंबर, कार्ल मार्क्स, गांधी, आंबेडकर, डार्वीन, न्युटन, आईनस्टाईन ! बहुदा Alon Musk यापुढील जग बदलणार आहे !
माणसाप्रमाणे विचार करणारे मशीन—
AI अर्थात कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजे माणसाप्रमाणे विचार करणारे मशीन किंवा तंत्रज्ञान किंवा त्याची स्वरुपे अनेक पद्धतीने अविष्कृत होत आहेत .पहिला माणुस आणि दुसरा नवा माणुस पहिला माणुस जन्माला घालत आहे. आता सध्या दुसरा माणुस पहिल्या माणसाची आज्ञा पाळत आहे. अगदी ‘अल्लाउद्दिनच्या दिव्या’तील ‘जीन’ पाळतो. तशी. लाकडाउनमधे टिव्हीवर आपण पाहिले की एक यंत्र स्वत: प्रत्येक खोलीमधे जेवण , नाष्टा, चहा वगैरे स्वत: चालत जावुन देत असे. परतही येत असे. जे जेव्हा माणसांना लागेल ते व्यवस्थितपणे नेउन देत असे.
AI ची सुरुवात पण ही प्राथमिक अवस्था. …
ही अगदीच प्राथमिक अवस्था आहे. उद्या काहीही अगदी कल्पवृक्षाप्रमाणे समोर आणून ठेवेल . अगदी ‘तो’ आनंद सुद्धा देईल.यावर Hollywood मधे चित्रपत निघाले आहेत.
AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे कसे काय करणार आहे ? अशी जिज्ञासा करोडो लोकांना आज पडली आहे. माणसात बुद्धी नेमकी की वापरली जाते ? हे समजले तर या नव्या माणसात ,माणसास pharrell असे काम कसे करणार आहे, हे समजेल. पहिल्या माणसामधे म्हणजे आपल्यात बोध होणारी माहीती मेंदुमधे save होते. मेंदुमधे न्युरान्सचे जोड bond तयार होतात.एक प्रकारचे ठसे समजा . जसा एखाद्या पाऊलवाटेचे चिन्ह तयार होते. तसे ठसे निर्माण होतात. यातुन विद्युत प्रवाह गेल्यावर ते चमकतात. म्हणजे computer वर जसे display होते तसे ते मनात येते , उमटते,आठवणीत येते.असे करोडो bonds मेंदुतील न्युरान्सचे निर्माण होतात. सर्व मिळुन बनतो तो तो मेंदु असतो.मन मेंदुचाच भाग आहे असे वैज्ञानिक मानतात. तेवढेच तो माणुस अनुभन करु शकतो. तेवढेच त्याचे जग ! बाकीचं जग त्याच्या समजण्याच्या ‘आयामा’बाहेर (Dimension) अस्तित्वात असते . ते त्याला कधीच समजु शकत नाही. अगदी वैज्ञानिकांना देखील !
AI आणि Quantum Physics. …
म्हणुन म्हटले जाते की जेवढ्या माणसांच्या खोपड्या तेवढी विश्वे असतात ! पण हा भ्रम Hallucination असतो .एकुणच सर्व hallucination आहे असेही वैज्ञानिक quantum physics नंतर म्हणु लागले आहेत. त्यातच माणुस जगतो आणि मरतो. म्हणुन वैज्ञानिक असंसुष्ट राहतात. पण आणखीन पुढे काय आहे , हे शोधत रहातात. मात्र ही प्रेरणा पृथ्वीवरील फक्त मानव Species, या एकाच प्रजातीत का आहे ? इतर प्राणिमात्रांत का नाही ? की मानव या ग्रहावरचा ‘मुलनिवासी’ नाही. तर दुसर्या ग्रहावरील प्रगत तंत्रज्ञान विकसित झालेल्या प्रजातीने मानवाला पृथ्वीवर काही लाख किंवा कोटी वर्षांपुर्वी पृथ्वीवर आणले, plant केले,genetic engeering चे प्रयोग करुन मानव निर्माण केला असावा ?
तर AI मधे जगातील उपलब्ध सर्व माहीती , deta एकत्र आणण्यात आला आहे . त्यामधे तो चित्र , चिन्हे, audio,video इ.अनेक स्वरुपात आहे.तो वापरला जातो.(input), त्याचे अत्यंत वेगाने (analysis) करून क्षणात निष्कर्ष काढला जातो.(output).नंतर प्रदर्शित केले जाते . पहिल्या मानवाचा मेंदु/computer मधे त्याचा व्यक्तीगत deta असतो. पण दुसर्या parellel माणसामधे सर्व माणसांकडे असलेला deta उपलब्ध असतो. म्हणून तो प्रचंड क्षमतेने काम करतो. पण त्याला अजुन तरी पहिल्या माणसाची आज्ञा किंवा prompt वापरावा लागतो.जो deta या नव्या माणसाकडे उपलब्ध नाही . अशा deta वर तो काही करू शकत नाही . तशी कबुलीही देतो ! आपण chatgpt, openAI किंवा bing इ. वापरताना हे सहज अनुभवतो.
Parellel माणुस?
पण ही सुरुवात आहे . वेगाने दररोज यावर पहिल्या माणसाकडुन काम केले जात असल्याने दुसरा parallel माणुस जास्त ताकतवान होत जात आहे. पहिल्या माणसाच्या आवाजाचे clonning करण्यात AI ला यश मिळाल्याची ताजी बातमीही आहे .
तात्पर्य हे की आपल्याला या नव्या अवस्थेत धाडसाने प्रवेश करावा लागेल. कमजोर डार्वीनच्या सिद्धांतानुसार संपून जातील.
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com