
Contents
- 1 AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर कसा करायचा ? अर्थात AI टूल्सची ओळख आणि त्यांचा उपयोग याचा एक मागोवा !
- 1.1 AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्ता वापरण्यासाठी आहेत अनेक Tools !
- 1.1.1 कृत्रीम बुद्धीमत्तेत AI टूल्स म्हणजे काय असते?
- 1.1.2 खास भेट :
- 1.1.3 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.4 AI Tools चा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपयोग काय आहे? —-
- 1.1.5 हे ही वाचा. …
- 1.1.6 ३. Business (व्यवसाय ) क्षेत्रातील AI Tools चा वापर –
- 1.1.7 ४. Media मीडिया आणि Entertainment मनोरंजन क्षेत्रात AI Tools चा वापर—
- 1.1.8 AI Tools चा भविष्यातील मानवावर प्रभाव—
- 1.1.9 निष्कर्ष—-
- 1.1.10 About The Author
- 1.1 AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्ता वापरण्यासाठी आहेत अनेक Tools !
AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर कसा करायचा ? अर्थात AI टूल्सची ओळख आणि त्यांचा उपयोग याचा एक मागोवा !
AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्ता वापरण्यासाठी आहेत अनेक Tools !
Shiru 8 March 2025 :
( Satyashodhak Editorial by Dr.Nitin Pawar)
AI Best Tools हे कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर कसा करायचा ? हे शिकवणारे सोपे साधन आहे. अर्थात AI टूल्सची ओळख आणि त्यांचा उपयोग याचा एक मागोवा इथे घेत आहोत. ते कृत्रीम बुद्धीमत्ता वापरण्यासाठी आहेत . ते मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात संशोधन करुन तयार केले जात आहेत. प्रत्यक्ष AI Tools चा वापर कसा करायचा हे शिकण्याआधी या काही गोष्टी मराठी माणसाला माहिती करुन देण्यासाठी आम्ही जो हा लेखन प्रपंच सुरु केला आहे. त्याचा हा दुसरा भाग आहे.
कृत्रीम बुद्धीमत्तेत
AI टूल्स म्हणजे काय असते?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे computer system ला मानवी बुद्धि सारखे काम करण्यास शिकवणे व त्याचे तंत्रज्ञान. आता AI टूल्स हे या कृत्रीम बुद्धीमत्तेचा उपयोग विशिष्ट कामे वेग व अचूकता साधुन पार पाडण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत .सतत नवीन टूल्स निर्माण केले जात आहेत.यात मशीन लर्निंग (ML), natural learning process (NLP) व संगणकाची स्वतःची एक समज (Computer Vision) आणि ऑटोमेशन अशा तंत्रांवर आधारित हे tools असतात.
हे AI टूल्सचा व्यक्तीगत आणि व्यावसायीक उद्देशांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरले जात आहेत.ते काम सोपे वेगवान आणि जास्त कार्यक्षमपणे करण्यासठी व्यक्ती व उद्योगांना मदत करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
AI Tools चा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपयोग काय आहे? —-
AI Tools चा वापर अनेक उद्योगांमध्ये केला जातो. अनेक क्षेत्रांमध्ये AI टूल्सचा कसा वापर केला जातो—-
१. Education क्षेत्रातील AI टूल्सचा वापर आपण पाहु—

शिक्षण व्यवस्थेत AI चा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यार्थ्यांना quality शिक्षण मिळावे. वैयक्तिक Learning experience मिळावा यासाठी AI टूल्स मोठी मदत करतात.
AI Tools चा शिक्षण क्षेत्रातील उपयोग —-
Online ऑनलाइन शिक्षण:
• यामधे ChatGPT, Google Bard यांसारखी AI Tools विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतात.
• Advance Education System : AI वर आधारित tutoring software विद्यार्थ्यांचा कल आणि नियमित प्रगतीनुसार त्यांना मार्गदर्शन करतात.
• Automatic स्वयंचलित मूल्यमापन : AI च्या मदतीने परीक्षांचे मूल्यमापन अचूक व जलद करता येते.
• Education Material Creating – शैक्षणिक सामग्री निर्मिती: AI Tools वापरुन शिक्षक study material तयार करतात. उदाहरणार्थ प्रेझेंटेशन, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स,टिप्स इ.
२. आरोग्य क्षेत्रातील AI Tools चा उपयोग कोनता?
Health Services जास्त वेगवान, प्रभावी आणि सुटसुटीत करण्यासाठी AI Tools चा मोठा वाटा आहे. निदान (dignosis) उपचार (treatment) आणि Research मध्ये AI मदत करत आहे.
AI Tools चा आरोग्य क्षेत्रातील वापर :
• रोगनिदान ( Diagnoses) : AI च्या मदतीने एक्स-रे, एमआरआय स्कॅन व अन्य वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण केले जाते.
• चिकित्सा सहाय्यक: AI आधारित व्हर्च्युअल (आभासी) सहाय्यक रुग्णांना प्राथमिक उपचार व सल्ला देऊ देतात.
• औषध संशोधन ( Medication Research) : नवीन औषधे शोधण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव (result) तपासण्यासाठी AI मदत करते.
• रुग्णसंख्या (statistic) व्यवस्थापन: AI च्या मदतीने रुग्णांच्या माहितीचे व्यवस्थापित करतात .
हे ही वाचा. …
३. Business (व्यवसाय ) क्षेत्रातील AI Tools चा वापर –
व्यवसाय क्षेत्रात AI Tools मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. ग्राहक सेवा, विपणन, विक्री आणि धोरणात्मक नियोजन AI द्वारे करता येते.
AI Tools चा व्यवसाय क्षेत्रातील वापर—
• Chatbots : ग्राहकांना पुर्णवेळ सेवा देण्यासाठी AI वर आधारित चॅटबॉट्स चा वापर करतात.
• डेटा विश्लेषण ( Deta Analysis) : AI च्या मदतीने Market Trends , ग्राहकांची पसंती आणि विक्री यांचे विश्लेषण करतात.
• Automation (स्वयंचलन): वेळखाऊ कामे auto generate करण्यासाठी AI Tools वापरतात.
• विपणन ( Distribution आणि जाहिरात (Advertisement) : AI Tools योग्य ग्राहकांना Target करण्यासाठी माहिती देतात.
४. Media मीडिया आणि Entertainment मनोरंजन क्षेत्रात AI Tools चा वापर—

AI चा उपयोग मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात अनेक प्रकारे केला जातो. कंटेंट क्रिएशन, एडिटिंग आणि users need नुसार सामग्री प्रदर्शित करण्यासाठी AI Tools वापरतात.
AI Tools चा मीडिया क्षेत्रातील वापर —
• Video Editing व्हिडिओ एडिटिंग: AI Tools व्हिडिओ एडिटिंग वेगात आणि प्रभावीपणे करतात.
• Music Creation संगीत निर्मिती: AI वर आधारित platforms आहेत.एसे suno हे App स्वतः संगीत तयार करते.
• कंटेंट शिफारस (Content Suggestion) : Netflix, YouTube यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर AI च्या मदतीने चित्रपट आणि व्हिडिओ बनवता येतात.उदा.chatgpt,bing
• Fake News फिल्टरिंग: AI च्या मदतीने fake खोट्या बातम्या शोधून काढतात.
AI Tools चा भविष्यातील मानवावर प्रभाव—
वेगाने AI चा विस्तारत आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान अजून अधिक develop होईल. विविध उद्योगांमध्ये (Industry) त AI मुळे मोठे बदल होतील. कामे जलद आणि अचूक होतील.
AI कृत्रीम बुद्धीमत्ता आणि भविष्यातील संभाव्यता:
• पुर्णपणे स्वयंचलित वाहने निर्मिती .उदाहरणार्थ चीनमधे अशी वाहने सुरु झाली आहेत.
• वैद्यकीय क्षेत्रात रोबोट शस्त्रक्रिया करतील.
• अधिक बुद्धिमान virtual assistant मिळेल.
• स्वयंचलित ग्राहक सेवा पद्धत वकसित होईल.
निष्कर्ष—-
AI Tools हे पुढील युगातील महत्त्वाचे साधन असणार आहे . शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, मीडिया व इतर क्षेत्रांमध्ये AI व AI Tools चा प्रभावी वापर होत राहणार आहे. AI अजून प्रगत होईल . अनेक नव्या संधी निर्माण होतील. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिकांनी AI Tools चा वापर करून आपले काम सोपे,जलद,प्रभावी करेल.हे चित्र स्पष्ट दिसते.