
Contents
- 1 जागतिक महिला दिन: शिरूर पोलीस ठाण्यात महिला सशक्तीकरणाचा अनोखा उत्सव संपन्न !
- 1.1 जागतिक महिला दिन:महिला पोलिस अंमलदारांनी फेटा बांधुन शिरुर शहरात काढली रैली!
- 1.1.1 खास भेट :
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 हे ही वाचा. …..
- 1.1.4 महिला पोलिस अंमलदारांचा बाईक रॅलीद्वारे सबलीकरणाचा संदेश-
- 1.1.5 महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे—
- 1.1.6 महिला दिनाचे महत्त्व आणि आवश्यकता-
- 1.1.7 शिरूर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम—-
- 1.1.8 महिला सबलीकरणासाठी आणखी पावले उचलण्याची गरज—
- 1.1.9 समारोप—
- 1.1.10 About The Author
- 1.1 जागतिक महिला दिन:महिला पोलिस अंमलदारांनी फेटा बांधुन शिरुर शहरात काढली रैली!
जागतिक महिला दिन: शिरूर पोलीस ठाण्यात महिला सशक्तीकरणाचा अनोखा उत्सव संपन्न !
जागतिक महिला दिन:महिला पोलिस अंमलदारांनी फेटा बांधुन शिरुर शहरात काढली रैली!
Shirur News 9 March:
( Satyashodhak News Report)
जागतिक महिला दिन 2025 हा शिरूर पोलीस ठाण्यात महिला सशक्तीकरणाच्या अनोख्या उत्सवाने संपन्न झाला आहे. यावेळी
महिला पोलिस अंमलदारांनी फेटा बांधुन शिरुर शहरात काढली बाईक वरुन यात्रा रेली काढली आणि आपली सामाजिक संवेदनशिलता जपली आहे. महिला पोलिस अंमलदार यांनी अलिकडे शहरातील बिगडत चाललेल्या मुलींना अपप्रवृत्तींपासुन वाचवण्याची लक्षणिय कामगिरी केली आहे. बेकायदेशीर कृत्ये करण्यास मुभा देणार्या कैफे चालकांवरील कारवाईत जातीने सहभाग घेतला आहे.तरुण मुलींनी शिक्षण व आपल्यासारखेच पोलिस खात्यात जावुन सेवा देण्याचे करियर निवडुन जीवनाला योग्य दिशा देण्याचा संदेश मुलींना दिला आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण देशभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यावर्षी शिरूर पोलीस ठाण्यात हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. पोलिसांच्या कठोर ‘वर्दी’त कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदारांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे .
हे ही वाचा. …..
What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार करणार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध !
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदारांना फेटे बांधण्यात आले. साडीही भेट देण्यात आली. हा कार्यक्रम खरा महिलांच्या सन्मानाचे आणि सशक्तीकरणाचे प्रतिक ठरला आहे. महिलांनी केवळ चुल व मुल नाही तर समाज आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव या अशा प्रकारे करण्यात आला आहे.
महिला पोलिस अंमलदारांचा बाईक रॅलीद्वारे सबलीकरणाचा संदेश-
या विशेष कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महिला पोलीस अंमलदारांनी काढलेली बाईक रॅली हा आहे. शिरूर शहरातून निघालेल्या या भव्य रॅलीने “महिला सबलीकरण” आणि “समानता” यांचा संदेश दिला आहे. समाजातील प्रत्येक महिलेला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता पुढे यावे, हा या रॅलीचा उद्देश होता.
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे—
पोलीस दलातील महिला अंमलदार या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच महिलांसाठी प्रेरणा देणारी भूमिकाही बजावतात. पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य पार पाडणाऱ्या या महिला पोलिसांनी कठोर मेहनत, शिस्त, आणि निर्भयता यांचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
या कार्यक्रमातून समाजातील सर्व महिलांना स्वत:ला सक्षम करण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संदेश देण्यात आला आहे. महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे. स्वतःसाठी आवाज उठवावा आणि कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता समाजात आपले स्थान निर्माण करावे. असा संदेशही या उपक्रमातून मिळाला आहे.
महिला दिनाचे महत्त्व आणि आवश्यकता-
जागतिक महिला दिन हा महिला हक्क, समानता आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस असतो. आजही समाजात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी समान संधींचा अभाव, लैंगिक भेदभाव आणि सुरक्षेच्या प्रश्नांसारख्या समस्या कायम आहेत. अशा परिस्थितीत, महिलांना सक्षम बनवणे, त्यांना शिक्षण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढे नेणे गरजेचे आहे.
शिरूर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम—-
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये झालेला हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. महिला पोलीस अंमलदारांचा सन्मान, त्यांचे कार्य आणि त्यांच्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
महिला सबलीकरणासाठी आणखी पावले उचलण्याची गरज—
महिला दिनानिमित्त अशा कार्यक्रमांचा जागरूकता वाढविण्यासाठी उपयोग होतो. मात्र, महिला सबलीकरण केवळ एका दिवसापुरते न राहता, संपूर्ण वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे. महिला सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना, त्यांना योग्य संधी, आर्थिक स्वायत्तता आणि शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर भर देणे आवश्यक आहे.
समारोप—
शिरूर पोलीस स्टेशनने घेतलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. महिलांना सक्षम करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. महिला ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा सन्मान करावा. त्यांना समानतेची वागणूक द्यावी आणि त्यांच्या प्रगतीसाठी पाठिंबा द्यावा.